आथर्डी, इटकुर, पाथर्डी परिसरात भेट देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्याने शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतीची जमीनही खरवडून गेल्याचे दिसून आले.
या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. लवकरात लवकर आवश्यक मदत मिळवून देण्याबाबत त्यांना आश्वासित केले. या नुकसानीच्या अनुषंगाने तातडीने पंचनामे करून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण तहसीलदार, तलाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
