सोलापूर – महाराष्ट्र शासनाने शासन परिपत्रक क्रमांक पुसक २०२३/प्र. क.१८/सा.का.३ दिनांकानुसार दांडपट्टा या ऐतिहासिक शस्त्र राज्यशस्र म्हणून मान्यता दिली आहे शिवकालीन इतिहासात मोलाचे स्थान लाभलेला या लढाऊ कलेचा अभ्यास अनेक विद्यार्थी खेळाडू आणि तरुण पिढी करत आहे.
महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेत मर्दानी खेळाचे विशेष महत्त्व आहे आज राज्यातील विविध ठिकाणी दांडपट्टा या खेळाचे प्रशिक्षण ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन सोलापूर (महाराष्ट्र) यांच्यामार्फत दिले जात असून अनेक जिल्ह्यांमध्ये सदर असोशियन कडून प्रशिक्षण शिबिर आयोजित करत शिवकालीन खेळाचे प्रचार प्रसार केले जात आहे.मात्र एवढी पारंपारिक आणि ऐतिहासिक शौर्य कला असूनही हा खेळ शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये अद्यापही समाविष्ट केलेला नाही.
नुसते राज्यशस्त्र म्हणून याला मान्यता दिल्याने तरुण पिढींना विद्यार्थिनींना हा शिवकालीन ज्वलंत इतिहास लाभलेला खेळ कळणार नाही यासाठी याला शालेय खेळामध्ये समाविष्ट करावे यासाठी ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन सोलापूरच्यावतीने दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद पुनम गेट समोर सोलापूर यांचे समोर बेमुदत दांडपट्टा दिवस-रात्र चालवीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात येत आहे.