सोलापूर – महिला पतंजलि योग समिती आयोजित जिल्हास्तरीय योगासन व सुर्य नमस्कार स्पर्धा – २०२५ रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी दु. ०१ ते ०५.०० वा.या वेळेत इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सिद्धी सुझुकी शोरूमजवळ, हेडगेवार ब्लड बँकेच्या खाली, सोलापूर येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यशस्वी उद्योजिका चंद्रिका चव्हाण (संस्थापिका, उद्योगवर्धिनी संस्था),रोहिणी तडवळकर (शहराध्यक्षा, सोलापूर भा.ज.पा.) तसेच परीक्षक माया गांधी (योगतज्ञ),स्नेहल पेंडसे (एन.वाय.एस.एफ. जिल्हा समन्वयक),संगिता जाधव (राष्ट्रीय समन्वयक, गीता परिवार),संतोष दुधाळ (एन.वाय.एस.एफ. राज्य पंच) यांची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यक्रमाचे आयोजन संगिता जाधव,भारत स्वाभिमान महामंत्री, सोलापूर,सुजाता शास्त्री, महिला जिल्हा प्रभारी, सोलापूर, सुधा अळ्ळीमोरे, वरिष्ठ महिला राज्य प्रभारी, महाराष्ट्र व पतंजली परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे .