सोलापूर – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने १२ ऑगस्ट २०२५ रोजी रेल्वे मंत्रालयाच्या “हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत डीआरएम कार्यालय ते सोलापूर रेल्वे स्टेशनपर्यंत एक उत्साही तिरंगा यात्रा आयोजित केली.
या यात्रेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी आणि अभिमानाने प्रदर्शित करण्यासाठी प्रेरित करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे, एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या आदर्शांना प्रोत्साहन देणे हा होता. सहभागींनी उत्साहाने तिरंगा फडकावला, यात्रेचा मार्ग आनंद आणि एकतेच्या वातावरणाने भरला.
या मोर्चाचे नेतृत्व सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक व अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी केले. या कार्यक्रमात विभागीय अधिकारी, रेल्वे कर्मचारी, रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी आणि रेल्वे खेळाडूंचा मनापासून सहभाग दिसून आला.