सोलापूर : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा सण. या निमित्ताने आस्था रोटी बँक व आस्था फाऊंडेशन (संस्थापक विजय छंचुरे) तर्फे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) एसटी कामगार आणि आश्रमामधील आजोबांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
एसटी कामगार हे राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांना सुरक्षितपणे व वेळेत त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचविण्यासाठी दिवस-रात्र अविरत सेवा देतात. त्यांचे हे योगदान समाजासाठी मोलाचे आहे. तसेच, आश्रमातील ज्येष्ठ नागरिक आपले अनुभव, संस्कार आणि माया पुढील पिढीकडे पोहोचविणारे अमूल्य ठेवे आहेत.




एसटी महामंडळ यांना कुठले सणवार माहीत नसतात ते सकाळी उठले की ड्युटीला येतात आणि त्यांना ते सणवार माहित पडत नाहीत म्हणून आस्था रोटी बँक यंदाची राखी पौर्णिमा एसटी महामंडळ मधील कंडक्टर ड्रायव्हर वर्कशॉप मधील काम करणारे कामगार व तसेच प्रवाशांना सुद्धा राखी बांधण्यात आले आहे.
यावेळी एसटी महामंडळाचे सोलापूर डिव्हिजनचे जिनदोडे, कांबळे सर व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.




रक्षाबंधनाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था रोटी बँकेचे महिला कार्यकर्ते नीलिमा हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा मेहता, नेता आकुडे, संगीता छंचुरे, विजयालक्ष्मी शिंदगी ,विद्या सिंगम ,स्वामी,अर्चना कांबळे,सपना कांबळे,अरुण गवळी ,या सर्वांनी आज रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्व बांधवांना राखी बांधले
तसेच आस्था रोटी बँकेचे कार्यकर्ते प्रकाश डोंगरे व पुष्कर पुकाळे यांनी खूप मोलाचे कार्य केले आहे.
सोलापूर मधील विविध आश्रमामधील आजोबांना राखी बांधून आपुलकी निर्माण रक्षाबंधन साजरी केले.
विजय छंचुरे यांच्या आस्था फाऊंडेशनने केलेल्या या उपक्रमांमुळे समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत प्रेमाचा, स्नेहाचा आणि आस्थेचा हात पोहचविण्यात आला. “आपली छोटी मदत कोणाच्या आयुष्यात मोठा आनंद निर्माण करू शकते,” असा संदेश यावेळी देण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे केले तर आभार प्रदर्शन नीलिमा हिरेमठ यांनी केले.