येस न्युज मराठी नेटवर्क : दि. ०७/०८/२०२५ रोजी सायं १७.३० वा चे सुमारास इसम नामे विष्णु शिवराय हांडे, वय ३५ वर्षे रा. प्लॉट नं २, साई नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर हे एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येवुन त्यांचा भाऊ शरणु शिवराय हांडे वय ३६ वर्षे रा. प्लॉट नं २, साई नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर याचे राज बिअर शॉपीच्या पाठिमागे, समाधान नगर रोड, सोलापूर येथुन ०५ ते ०६ इसमांनी पांढरे रंगाची चारचाकी वाहनातुन अपहरण केले आहे असे सांगितले. त्यानंतर अशी खबर मिळताच सदर ठिकाणी एमआयडीसी पोलीस कडील स्टाफ रवाना करण्यात आला. घटनास्थळी हजर असणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडुन सदर घटनेची माहिती घेण्यात आली. त्यांनी अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचे वर्णन व इसमांचे वर्णन यांची माहिती दिली. त्याअनुषंगाने पोलीसांच्या ०४ टिम तयार करण्यात आल्या. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी तसेच तांत्रिक तपास करून वाहन कोणत्या दिशेने गेले याबाबतचा तपास करण्यात आला. सदर वाहनाचा पाठलाग करून वाहनामधुन अपहरण झालेला इसम नामे शरणु शिवराय हांडे वय ३६ वर्षे रा. प्लॉट नं २. साई नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर व अपहणकर्ते इसम नामे (१) अमित म्हाळप्पा सुरवसे वय २९ वर्षे रा. मणिधारी सोसायटी, अक्कलकोट रोड, सोलापूर (२) सुनिल भिमाशंकर पुजारी वय २० वर्षे रा. ३३/३ साईबाबा चौक, सोलापूर (३) दिपक जयराम मेश्राम वय २३ वर्षे रा. लोकमंगल हॉस्पिटल जवळ, आशा नगर, सोलापूर (४) अभिषेक गणेश माने वय २३ वर्षे रा. एकता नगर, सोलापूर यांना तसेच अपहरणासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची टोयाटो कंपनीची चारचाकी वाहन क्र MH12XX6547 ही मौजे होती गावाजवळील विजयपुर ते सोलापूर कडे येणा-या हायवेचे उड्डाणपुलाजवळ, होर्ती, जि. विजयपुर राज्य. कर्नाटक येथुन ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अपहरणकर्त्याकडुन लोखंडी हत्यारे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदरची घटना ही पुर्ववैमन्यासातुन झालेली आहे.