सोलापूर- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार “हर घर तिरंगा २०२५” ही जनजागृती राष्ट्रभक्तीपर मोहीम २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत देशभरात राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून शहरात विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून त्या अनुषंगाने आज अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी “हर घर तिरंगा २०२५” उपक्रम राबविण्या सदर्भात बैठक घेतली. या बैठकसी उपायुक्त तैमूर, मुलाणी सहायक आयुक्त शशिकांत भोसले, सहायक आयुक्त मनीषा मगर,तपन डंके, सतीश एकबोटे, राजेश परदेशी यांच्या सह संबंधित अधिकारी उपस्थिती होते.
सोलापूर महानगरपालिकेचे महत्त्वाचे उपक्रम
टप्पा १: (२ ते ८ ऑगस्ट २०२५)
शाळांच्या भिंती तिरंग्याच्या रंगांनी व चित्रांनी सजवणे.
शाळांमध्ये तिरंगा रांगोळी व तिरंगा राखी स्पर्धांचे आयोजन,तिरंगा प्रदर्शने, देशभक्तीपर पत्रलेखन मोहीम
विद्यार्थी व युवकांसाठी तिरंगा प्रश्नमंजुषा स्वयंसेवकांची नोंदणी व त्यांना प्रमाणपत्र वाटप
सोशल मीडियावर #HarGharTiranga2025 हॅशटॅगसह सेल्फी शेअर करण्याचे आवाहन
टप्पा २: (८ ते १२ ऑगस्ट २०२५)
शहरात तिरंगा महोत्सव आणि तिरंगा मेळ्याचे आयोजन, देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणांसह सांस्कृतिक कार्यक्रम,तिरंगा बाईक रॅली, सायकल रॅली, तिरंगा यात्रा,प्रमुख चौक, उद्याने व बाजारपेठांमध्ये तिरंगा सजावट घरोघरी तिरंगा वितरणासाठी बचतगट व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग,तिरंगा कॅनव्हास व तिरंगा प्रतिज्ञा कार्यक्रम
टप्पा ३: (१३ ते १५ ऑगस्ट २०२५)
प्रत्येक घर, कार्यालय, वाहन यावर राष्ट्रध्वज फडकावणे
१५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण समारंभ
HarGharTiranga.com वर सेल्फी व प्रतिज्ञा अपलोड,मीडियाद्वारे उपक्रमांचे प्रसारण,नागरी भागांतील प्रमुख इमारती व ठिकाणी तिरंगा प्रकाशयोजना,तिरंगा विक्री व वितरणासाठी विशेष योजना महानगरपालिकेचा विशेष सहभाग
विविध ठिकाणी तिरंगा रांगोळी, कॅनव्हास व सेल्फी पॉईंट्स उभारणी करण्यात येणार आहे.
नागरिकांना आवाहन
सोलापूर महानगरपालिका सर्व नागरिकांना आवाहन करते की, त्यांनी १५ ऑगस्ट रोजी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीचा अभिमान व्यक्त करावा.आपली तिरंगा सेल्फी www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करून प्रमाणपत्र मिळवावे आणि सोशल मीडियावर #HarGharTiranga व #HarGharTiranga2025 या हॅशटॅगसह शेअर करावे.असे आव्हान आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.