आतरराष्ट्रीय प्रार्थनायोग मंडळ, सोलापूर
सोलापूर – प.पू. महातपस्वी व योगमहर्षी श्री कुमारस्वामीजी हे आतरराष्ट्रीय किर्तीचे विचारवंत, तत्त्वज्ञानी, शिवयोग व प्रार्थनायोग याचे प्रणेते, लेखक, वक्ते, कवी व वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले दुर्मिळ असे संत होऊन गेले. स्वामीजीचे ६ वेळा युरोपियन देशाचे दौरे झाले. त्यांनी भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, शिवयोग व प्रार्थना योग इत्यादी अनेक विषयावर विद्वत्तापूर्ण व्याख्याने दिली आहेत.
परमपूज्य महातपस्वी श्री कुमार स्वामीजी याचा 116 वा जयंती महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम व रक्तदान शिबिर याचे आयोजन आहे. तसेच या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने राजेंद्र मायनाळ लिखित “महातपस्वी श्री कुमार स्वामीजी यांचे जीवन व कार्य या ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन समारंभ दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे शुभहस्ते होणार आहे याप्रसंगी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा. विश्वनाथ चाकोते, माजी आमदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 ते ते बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 या कालावधीत रोज सायंकाळी ५:३० ते ७ या वेळेत मान्यवरांची व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यालय “योग-विहार इंदिरा नगर पोस्ट ऑफिस जवळ, विजापूर रोड, सोलापूर
रेसी राजेंद्र मैनल, बालाजी हाउसिंग सोसायटी, होटगी रोड, सोलापूर पीपीएच ०२१७-२६०७१९८ मोबाईल ९९२२९१२४३४