येस न्युज मराठी नेटवर्क : भीमा कोरेगाव प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात NIA ने ८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, हॅनी बाबू, सागर गोरखे, रमेश गैचोर, ज्योती जगताप, स्टॅन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. भीमा कोरेगावमध्ये २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी आजच राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्टॅन स्वामी यांना झारखंडमध्ये अटक केली. त्यापाठोपाठ आज आठ जणांविरोधात FIR दाखल केला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव मध्ये हिंसाचार उसळला होता. त्यापूर्वी एक दिवस पुण्यातल्या शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात या हिंसेचं मूळ आहे असा पुणे पोलिसांचा आरोप आहे.