सोलापूर -दि,२५.श्रावण मासानिमित्त सोलापुर श्रीशैलम बससेवेचा शुभारंभ आगारप्रमुख उत्तम जुंदळे यांच्याहस्ते करण्यात आले.
श्रावण मासानिमित्त या विशेष बससेवेचा शुभारंभ करण्यात आले असुन भाविकांनी लाभ घेण्याचे करावे असे आवाहन करण्यात आले सोलापुरहुन ही बस सकाळी 6 वाजता सुटणार आहे तर रात्री आठ वाजता श्रीशैलम येथे पोहचणार आहे.
बसचे तिकिट दर ७७९ महिलांसाठी ६९३ ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र बाॅर्डर पर्यंत मोफत व तिथुन ५९७ एडव्हान्स बुकींगवर १५ टक्के सुट असणार आहे ग्रुप बुकींगसाठी सोलापुर आगाराशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आगारप्रमुख उत्तम जुंदळे, एमईओ शीतल बिराजदार, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी सहाय्यक वाहतूक निरिक्षक युवराज घुगे,प्रशांत महाजन,वाहक निलेश कुलकर्णी,महावीर नळे,चालक सचिन गुंड,श्रीशैल शिरोळकर यांची उपस्थिती होती.