सोलापूर : सोलापुरातील सर्व गवळी समाज बांधव व भगिनी यांच्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही आई प्रतिष्ठाणच्या वतीने गवळी समाजातील इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व करिअर मार्गदर्शन दिनांक 27/07/2025 रोजी सायंकाळी ठिक 6.00 वाजता शिवानुभव मंगल कार्यालय, मीठ गल्ली, सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिध्द वक्ते प्रा.विशाल गरड, तसेच शिवसेनेचे मुलुख मैदानी तोफ, शिवसेनेचे राज्य प्रवक्ते प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांचे यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी करियर मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित केले आहे. तरी सोलापूर जिल्हयातील गवळी समाजातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालकांनी याचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन आई प्रतिष्ठान गवळी समाज सामाजिक संस्थेकडून करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस प्रशांत संभाजी झिपरे,संदीप संतोष कालगते,प्रसाद नरसिंग भास्कर,सागर प्रभाकर अंजीखाने,योगेश केशव झिपरे,किरण भागवत रानसेजें,अशोक रामचंद्र झिपरे,राजू दत्तात्रय शहापूरकर,उमेश नागनाथ बडवणे,विनोद सिध्दू बडवणे,राहूल बाबू मिसाळ,प्रदीप हेमंत पांगुडवाले यांच्यासह आई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

