सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूरच्या वतीने द. भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला. प्रारंभी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन झाले. संस्थेचे स्थानिक सचिव डॉ. महेशजी चोप्रा, प्रशासकीय अधिकारी डॉ. व्ही. पी. उबाळे, प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, उद्योजकता केंद्राचे अधिकारी श्री हनुमंत नलावडे यांचे उमेदवारांना मार्गदर्शन लाभले. वेगवेगळ्या १३ कंपन्या त्यांना लागणाऱ्या मानवी संसाधनांची भरती केली. एकूण ९४२ जागांसाठी या मुलाखती आयोजित केल्या होत्या.हा रोजगार मेळावा मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य राखून आयोजित करण्यात आला होता.

मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यगौरवाचे प्रकट वाचन केले. या प्रसंगी बोलताना मा. सचिव डॉ. महेशजी चोप्रा यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. चोप्रा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकौशल्याचे कौतुकाने उल्लेख केला. युवकांना नोकऱ्या देण्याकरिता आलेल्या कंपन्यांचे त्यांनी आभार मानले. या मेळाव्यात ३४४ उमेदवारांनी सहभाग नोंदवला. चैतन्य इंडिया फिनक्रिडीट प्रा. लि. सोलापूर, कायझन होंडा, स्मृती ऑर्गेनिक प्रा. लि., सृजन फूडस प्रा. लि., मुथूट मायक्रो फा. प्रा. लि., श्रीविज्ञा इंफोटेक, आर. के. एंटरप्रायझेस, एशियन मॅन पावर, किरण इन्फोटेक प्रा. लि., स्पिनी व्हॅल्यू ड्राईव्हटेक प्रा. लि., इक्विटास बँक, वर्कफोर्स सेंटर, व्ही ट्रान्स प्रा. लि., या कंपन्यांनी ९४२ जागांसाठी मुलाखती घेतल्या. त्यातून १४२ उमेदवारांची निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल स्थानिक सचिव डॉ. महेशजी चोप्रा, प्रशासकीय अधिकारी डॉ. व्ही. पी. उबाळे, जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार केंद्राचे अधिकारी श्री.हनुमंत नलावडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या आयोजनात डॉ. शामकुमार देशमुख, डॉ.जी.डी.बिराजदार, डॉ. आर. व्ही. शिंदे, प्रा. जी. एस. घनाते,डॉ.ए.एस.बिराजदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.