शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना फुटल्याची खंत असून, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी आशा असल्याचे ते म्हणालेत. शिवसेना म्हणून आपण एकत्र असले पाहिजे, शिवसेनेची एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्रित येण्याची अपेक्षा अंबादास दानवे यांनी केली.
अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचा निरोप समारंभ पार पडला. दानवेंच्या निरोप समारंभाच्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची एकमेकांवरील टोलेबाजी पाहायला मिळाली. तसेच अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या फोटोसेशन वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांकडे पाहणे टाळले होते आणि बाजूला बसणे देखील टाळले होते. आता