कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत कोकाटेंवर जोरदार टीका केली आहे. “कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा, कर्जमाफी द्या!” अशा आशयाच्या हॅशटॅगसह त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर निशाणा साधला.
रोहित पवार यांनी X वर लिहिले की, जंगली रमी पे आओ ना महाराज…! सत्ताधारी राष्ट्रवादी गट भाजपला विचारल्याशिवाय काहीच निर्णय घेत नाही. त्यामुळे शेतीच्या प्रश्नांवर निर्णयच होत नाहीत. दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना कृषिमंत्री निवांत रमी खेळत असल्याचे दिसत आहे, असे म्हणत रोहित पवारांनी काेकाटेंवर निशाणा साधला आहे.
रोहित पवारांचे X वरील पोस्ट काय?
आमदार रोहित पवार म्हणाले की, जंगली रमी पे आओ ना महाराज…! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषि मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिक विमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का? कधीशेतीवरयामहाराज खेळथांबाकर्जमाफीद्या ‘रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिक विमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?’ असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी विचारला आहे.
शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय… वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार म्हणाले की, या खोटारड्या, धोकेबाज सरकारला शेतकऱ्यांशी काही देणंघेणं राहिलं नाही, शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय, म्हणून माझं शेतकरी बांधवांना आवाहन आहे यांना धडा शिकवा.