सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती बरोबरच गावागावामध्येही उद्योजक निर्माण व्हावेत, हा उदात्त हेतू ठेवून दैनिक पुण्यनगरी आणि सेलिब्रेट किया मोटर्स यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच , नामांकित उद्योजक व डॉ. वैशपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री, किया मोटर्सचे नितीन बिजरर्गी, सेल्स ऑफिसर प्रशांत बनकर, दैनिक पुण्यनगरीचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी यांनी महामार्गावरील कोंडी येथील किया मोटार्सच्या शोरूम मध्ये टॉक शोचे आयोजन केले होते.

या टॉक शोमुळे जिल्ह्यातील विविध गावातील उद्योग वाढीच्या समस्या व त्यावर असणारे उपाय आणि राज्यांमध्ये जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चर्चा केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मांडलेल्या प्रश्नांची उकल करण्याकरिता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन करून सदरचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, आनंद तानवडे,आदिनाथ देशमुख, शशिकांत कराळे, अण्णासाहेब पवार, धनाजी गावडे, सतीश केचे, गणेश पाटील, राजाराम येवले, नामदेव चिंतामण, भारत सुतकर, अमोल कोरके, महेश कोरके दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक कृष्णकांत चव्हाण शरीफ सय्यद मार्केटिंग विभागाचे उमेश शिखरे, कपिल कुचन आधी जाऊन उपस्थित होते