जल जीवन मिशन अंमलबजावणीसाठी गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करा – शिष्यपाल सेठी…
सोलापूर – जिल्ह्यात जल जीवन मिशनची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणीसाठी गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाल शेठी यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौऱ्यावर आलेले शिष्यपाल शेठी यांनी आज जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) - २ अंतर्गत अकोलेकाटी व कारंबा ग्रामपंचायतीस भेट दिली.या प्रसंगी याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, उत्तर सोलापूरचे गट विकास अधिकारी राजाराम भोंग, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उपअभियंता योगीराज बेंबळगी, नाबार्डचे महेश शिरपूर, पी.एच.कुलकर्णी, संवाद सल्लागार सचिन सोनवणे , क्षमता बांधणी सल्लागार शंकर बंडगर, शाखा अभियंता जयवंत जाधव, यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अकोलेकाटी व कारंबा या ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांशी संवाद साधला.अकोलेकाटी येथे यावेळी सरपंच सौ.अंजली क्षिरसागर, उपसरपंच सतिश लामकाने,सदस्य सर्जेराव पाटील, नंदा अष्टले, सुरेखा गोरे, दिपक डांगे, राजेंद्र घाटे, उर्मिला शिंदे, प्रज्ञा पवार, ज्ञानेश्वर गवळी, कांचन लामकाने, अंबिका मस्के, ग्रामपंचायत अधिकारी भालचंद्र काळे, मिरा पिटले
तसेच ग्रामपंचायत कारंबा येथे सरपंच तुकाराम चव्हाण, उपसरपंच ज्योती भोरे,सदस्य ज्ञानेश्वर जगताप, शिवबाई काळे, स्नेहल मस्के, तकदीर शेख, ज्योती भोरे, विनायक सुतार, कमल पाटील, जयश्री शिराळ, दत्ता पवार, जयश्री कांबळे, दिव्या कोकरे, महिबूब शेख, विस्तार अधिकारी सोमनाथ शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी मनिषा देशमुख,रेश्मा नागटिळक, नंदकुमार पाटील, गंगाधर कांबळे आदी उपस्थित होते.यावेळी गावातील पाण्याची विहीर व पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाकीची पाहणी केली.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) - २ अंतर्गत सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक शौचालयांची पाहणी केली तसेच ग्रामपंचायतीस पाणी पुरवठा करणारे योजनेची पाहणी शिष्यपाल शेठी यांनी केली.सी.आर.सी.मोनिका दिनकर,आम्रपाली गजघाटे यांनी पाणी व स्वच्छता समितीची माहिती दिली.पाणी गुणवत्तेची माहिती सोनाली कुलकर्णी यांनी दिली.
जेसीबीने चारी खोदून केली पाईपची पाहणी
केंद्रीय पथकाचे शिष्यपाल सेठी यांनी आज ज्या ठिकाणी लोकांचे सुचने नुसार पाईपलाईन ची चारी जेसीबीचे सहाय्याने खोदून पाईपच्या गुणवत्तेची पाहणी केली.अपुर्ण कामे पुर्ण करणेसाठी संबंधित ठेकेदारांकडून लेखी घेऊन काल मर्यादेत काम पुर्ण करणेते सुचना दिल्या.पाईपचा दर्जा व टाकीचे कामाची गुणवत्ता चांगली ठेवा अशा सुचना केंद्रीय समितीचे सेठी यांनी दिल्या.
निधी अभावी जल जीवन मिशन ची कामे रेंगाळली..!
ग्रामस्थांनीच ठेकेदारांना निधी वेळेत मिळत नसलेने जलजीवन मिशनची कामे खोळंबली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मस्के यांनी केंद्रीय पथकाचे निदर्शनास आणून दिले.
केंद्रीय पथकाचा पायी चालत पाहणी…! त्रुटी असलेले ठिकाणी ठेकेदारां वर दंडात्मक कारवाईच्या सुचना
पाणी पुरवठा विहिरींचे ठिकाणी जाणे साठी रस्ता नसलेने पायी चालत विहिरींचे कामांची गुणवत्ता पाहिली. विहीरीचे व पाण्याचे टाकीचे मोजमापे घेऊन लोकांचे शंकाचे समाधान केले. तर अनेक ठिकाणी पाईप खोदाई करून कामे वेळेत पुर्ण करणेचे सुचना दिल्या. त्रुटी असलेले ठिकाणी ठेकेदारां वर दंडात्मक कारवाईच्या सुचना केंद्रीय पथकाचे प्रमुख शिष्यपाल सेठी यांनी दिल्या. काळ्या यादीत टाकायला देखील मागे पुढे पाहू नका अशा स्पष्ट सुचना दिल्या.