जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्या पत्रकार . अश्विनी तडवळकर, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी , सुहास छंचुरे (आस्था सामाजिक संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख) ,
सिद्धू बेऊर सहसचिव , पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका .रोहिणी सुरा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्येची देवता सरस्वती,आदरणीय स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे, स्वर्गीय राजेश अण्णा कोठे, स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रमुख मान्यवर यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका .रोहिणी सुरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर सदर जयंती चे औचित्य साधून शाळेतील इयत्ता नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून एक मूठ धान्य गरिबांसाठी या उपक्रमांतर्गत गहू ,तांदूळ ,व तुरदाळ हे धान्य घेऊन आस्था सामाजिक संस्थेला या शाळेच्या मुख्याध्यापिका.रोहिणी सुरा व विद्यार्थ्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
या नंतर शाळेची विद्यार्थिनी कुमारी .श्रेया होनकळस व सहशिक्षिका सौ. सुरेखा काळे यांनी सदर दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना मनोगततून व्यक्त केले.
यानंतर प्रमुख पाहुण्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले.
सदर जयंतीचे औचित्य साधून इयत्ता नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांकरिता रंगभरण स्पर्धा,
इयत्ता पाचवी व सहावी विद्यार्थ्यांकरीता झाडांच्या पानापासून विविध कलाकृती, तसेच इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांकरिता पुठ्ठा व वर्तमानपत्रा पासून पाण्याच्या बाटली पासून विविध प्रकारच्या कलाकृती हा उपक्रम, तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धा व उपक्रम चित्रकला शिक्षक श्री. सुनील कंटी, चित्रकला शिक्षिका अदिती मंठाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे माननीय डॉक्टर . राधिकाताई चिलका , माननीय डॉक्टर . सूर्यप्रकाश कोठे, माननीय देवेंद्र दादा कोठे, मा. प्रथमेश दादा कोठे, प्राध्यापक विलास बेत,व शाळेच्या मुख्याध्यापिका .रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.