• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, July 15, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी… जबरीचोरीच्या गुन्हयाची उकल, 03 चोरटे जेरबंद…

by Yes News Marathi
July 14, 2025
in इतर घडामोडी
0
स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी… जबरीचोरीच्या गुन्हयाची उकल, 03 चोरटे जेरबंद…
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – होटगी येथील साईबाबा मंदिराचे पाठीमागील जबरीचोरीच्या गुन्हयाची उकल, 03 चोरटे जेरबंद करुन 61,000/-रु. किंमतीचा मुद्देमालासह गुन्हयात वापरलेले दोन मोटार सायकल हस्तगत

     दि. 04/07/2025 रोजी दुपारच्या सुमारास यातील फिर्यादी सिद्धेश्वर कारखानाजवळ होटगी गावाकडे जाण्यासाठी चालत जात असताना त्यावेळी रस्त्याने मोटार सायकलवरुन जाणा-या एका इसमाने फिर्यादीस सोडतो चला असे म्हणल्याने फिर्यादी त्याचे मोटारसायकल बसल्यानंतर होटगी येथे सोडण्यास सांगितले असता तेव्हा दुस-या एका मोटार सायकलवरील दोघे असे तिघांनी मिळून फिर्यादीस होटगी येथील साईबाबा मंदिराचे पाठीमागे तलावाजवळील शेतामध्ये नेवून तिघांनी मिळून यातील फिर्यादीस शिवीगाळ करुन त्याचे अंगावरील कपडे उतरवून बेल्ट व काठीने  मारहाण करुन रोख रक्कम, गळयातील देवाचे सोन्याचे पदक, स्मार्ट वाॅच, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 29,600/- व मोबाईल फोन पे नंबर घेवून त्यावरुन 7900/- असा एकुण 37,300/- जबरीने काढून घेतले बाबत हेमाराम केहराराम जाट वय- 18 रा. सायंटा ता. बाडमेर राज्य राजस्थान यांनी फिर्याद दिल्याने वळसंग पोलीस ठाणे गु.र.नं. 324/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6), 3(5)  प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

    सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सपोनि नागनाथ खुणे, व त्यांचे पथकास गुन्हयाचे ठिकाणी भेट देवून आरोपीचा शोध घेवून त्याना ताब्यात घेवून कारवाई करणेबाबत सूचना देवून रवाना केले. सपोनि नागनाथ खुणे यांचे पथकातील पोलीस अंमलदार धनराजय गायकवाड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली. सदरचा गुन्हा हा मौजे होटगी ता.दक्षिण सोलापूर येथील राहणारा रावण गायकवाड, विकी गायकवाड रा. सेंटलमेंट काॅलनी सोलापूर व त्यांचा आणखीन एक साथीदार असे तिघांनी मिळून केला आहे. आता ते तिघेजण हे जुना पूनानाक्याजवळील स्मशानभुमीजवळ थांबलेले असून ते सोलापूर बाहेर निघून जाण्याच्या तयारीत असलेबाबत माहिती मिळाली. तेव्हा तात्काळ तेथे जावून त्या तिघांना ताब्यात घेवून त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी त्याची नावे  1) विकी दषरथ गायकवाड  सेंटलमेंट फ्री काॅलनी, सोलापूर 2) विनोद उर्फ रावण शवरप्पा गायकवाड  रा. होटगी ता. द. सोलापूर 3) जगदीश उर्फ राजू खाजप्पा संगटे रा. लहान इरण्णा वस्ती सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे वळसंग पोलीस पोलीस  ठाणेकडील जबरीचोरी गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्यानी तिघांनी सदरचा गुन्हा केल्याचे मान्य करुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या पैकी रोख रक्कम, गळयातील देवाचे सोन्याचे पदक, मोबाईल फोन, स्मार्ट वाॅच, व गुन्हयात वापरलेले दोन मोटार सायकलीसह असा एकुण 61,000/- चा जप्त करण्यात आलेला आहे. 

सोलापूर ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतलेली गुन्हेगारी टोळी ही सराईत जबरी चोरी करणारी टोळी आहे. वेगवेगळया जिल्हयातील पोलीसांची पथके या टोळीच्या मागावर होती. या टोळीचा प्रमुख आरोपी नामे विकी दशरथ गायकवाड वय 23 रा. सेंटलमंेट फ्री काॅलनी, सोलापूर याचेवर सोलापूर शहर पोलीसांनी एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाई केली होती. सदर टोळी ही सराईत टोळी असून गुन्हा करतेवेळी रस्त्याने जाणा-या इसमांना लिफ्ट देवून त्यांना एकांतात मारहाण करून त्यांच्याकडील पैसे, सोने इत्यादी साहित्य जबरीने काढून घेत असे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार, अक्कलकोट उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिश्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप,अनिल सनगल्ले, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, ख्वाजा मुजावर, मल्लप्पा सुरवसे, सफौ नारायण गोलेकर, पोह/ धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, दरेप्पा होनमुरे, प्रसाद मांढरे, महिला अमंलदार सुनंदा झळके, चापोना/ समीर शेख,यांनी बजावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वळसंग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखाचे प्रथक करीत आहेत.

Previous Post

सुंदरम फायनान्सद्वारे वारकऱ्यांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप…

Next Post

सोलापूर झेडपीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, पहा कोणत्या गटात कोणती गावे समाविष्ट..!

Next Post
सोलापूर झेडपीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, पहा कोणत्या गटात कोणती गावे समाविष्ट..!

सोलापूर झेडपीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, पहा कोणत्या गटात कोणती गावे समाविष्ट..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group