सोलापूर – यंदाच्या आषाढी वारीत लाखो समर्पित वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले असताना सुंदरम फायनान्सद्वारे सामाजिक बांधलकी म्हणून प्लास्टिकला नाही म्हणाचा संदेश वारकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आला. यानिमित्त वारकऱ्यांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्या वाटण्यात आल्या.
३ जुलै २०२५ रोजी, पंढरपूर शाखेतील कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांना विशेषतः डिझाइन केलेल्या पर्यावरणपूरक कापडी पिशव्या वाटल्या. ४ जुलै रोजी, सोलापूर शाखेतील कर्मचाऱ्यांनी सोलापूरमधील नान्नज येथील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्याच्या सीमेवर १०० कडुलिंबाची रोपे लावली. परंपरेप्रती आदर आणि अर्थपूर्ण, शाश्वत पद्धतीने योगदान देण्याच्या प्रामाणिक महत्त्वाकांक्षेमधून हा उपक्रम राबवण्यात आला.