आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा , 2002 अंतर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. यावर बोलताना ते म्हणाले,कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे.
कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच…!
विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे… महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे!