सोलापूर — सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरत असून, विशेषतः वयोवृद्ध, गरोदर माता, लहान मुले व दिव्यांग व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त व शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आदेश पारित केले होते.सदर आदेशानुसार, महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत अशा मोकाट जनावरांना पकडून त्यांना महानगरपालिका परिसरातील अधिकृत गोशाळांमध्ये कायमस्वरूपी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आज दिनांक 11 जुलै 2025 रोजी सोलापूर महानगरपालिकेमध्ये संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.



या बैठकीस विविध समाजांचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक पत्रकार सहभागी होते.या बैठकीत जनावरांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक त्या कायद्यांची माहिती, अंमलबजावणी प्रक्रिया, आणि सर्व संबंधितांनी सहकार्य कसे करावे याबाबत सविस्तर चर्चा झाली. मोकाट जनावरे रस्त्यावर आढळल्यास त्यांना लगेच पकडून गोशाळेमध्ये हलवण्यात येणार असून, जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांना जिओ टॅग लावून त्यांची महानगरपालिकेकडे नोंदणी करून घ्यावी जेणेकरून करून संबंधित मालकांना व महानगरपालिकेला जनावरांची माहिती साठी मदत होईल .जनावरे मुद्दाम सोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.




या बैठकीस तानाजी दराडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फौजदार चावडी पोलीस स्टेशन), शिवाजी राऊत (वरिष्ठ पोलीस निरीक्षक),श्रीमती जगताप (सहाय्यक पोलीस निरीक्षक, सदर बाजार पोलीस स्टेशन), शबनम शेख (जोडभावी पोलीस स्टेशन), प्रशांत जोशी (वरिष्ठ पत्रकार, दैनिक संचार), किरण बनसोडे (वरिष्ठ पत्रकार, दैनिक तरुण भारत),अक्षय अंजीखाने, देवा अंजीखाने, अनिल गवळी, राजू परळकर, संजय शहापूरकर , कट्टीमनी (आरोग्य निरीक्षक, कोंडवाडा विभाग) आदींची मान्यवर उपस्थिती होते.शहरातील मोकाट जनावरे रस्त्यावर सोडू नयेत व सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेस सहकार्य करावे.असे आव्हान मंडई व कोंडवाडा विभागाचे नियंत्रण अधिकारी यांनी तपन डंके केली.