सेालापूर.- जिल्हाधिकारी यांच्या दि.८ जुलै २०२५ रोजीच्या आदेशान्वये उत्तर सोलापूर तालुक्यातील सन २०२५ ते सन २०३० या कालावधीमध्ये मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणबाबत तरतुदी निश्चित केल्या आहेत. सदर नियमान्वये नियम २ अ मध्ये नेमून दिल्यानुसार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, खुला व महिला(अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरीकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रीयांसह) सरपंच पदे निश्चित करावयाची आहेत.
त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि.१५ जुलै २०२५ रोजी दुपारी ठिक १२.०० वाजता श्री.शिवछत्रपती सभागृह रंगभवन, सोलापूर येथे निश्चित करण्यात आला आहे.
तरी सदर ठिकाणी आपण ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमास निश्चित केलेल्या दिनांकास वेळेवर उपस्थित रहावे. जाहीर प्रकटनाची प्रसिध्दी उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नोटीस बोडांवर व चावडीवर तसेच सार्वजनिक ठिकाणी डकवून प्रसिध्द करण्यात येत आहे, अशी माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली.