युवावर्गाने आवर्जून उपस्थित रहाण्याचे आवाहन
सोलापूर : शाश्वत सांगाति प्रकाशन मंडळ, पुणे यांच्यातर्फे थोर नाथपंथी संत बाबा महाराज आर्वीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त संतसंग भावयात्रा उपक्रमातील तिसरा कार्यक्रम शनिवार दि. १२ जुलै दुपारी ३:४५ ते ७:०० दरम्यान डॉ. निर्मलकुमार फड़कुले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या विनामूल्य कार्यक्रमात वाळू कला, भक्तिगीते, लघुपट इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कलात्मक पद्धतीने संतगाथांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
सकल संतांच्या विचार आणि बोधात ऐक्यच आहे आणि या संतप्रेरित आणि त्यांच्या अनुभवगम्य विचारांनीच समाजाचे खरे उत्थान शक्य आहे. त्यांच्या विविध
बोधवचनांच्या चिंतनातून आणि लीलाप्रसंगातून हे कार्य साधण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आध्यात्मिक प्रेरणास्त्रोत संत स्वामी समर्थ, प. पू. नाना महाराज तराणेकर आणि प. पू. साईबाबा यांच्या आठवणींचं सुंदर कथन केले जाईल. प. पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या नवीन आठवणीही कलात्मक पद्धतीने सादर केल्या जातील. वाळू कला, भक्तिगीते, लघुपट या माध्यमातून कलात्मक पद्धतीने हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. सर्व साधक, भक्त आणि रसिक यांनी या विनामूल्य भावयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.