ग्रामविकास विभागाच्या निर्मल वारी उपक्रमामुळे भाविक खुश
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात विविध दहा संताच्या पालखी मार्गावर भाविकांसाठी ११ हजार फिरती शौचालये उभारण्यात आलेली आहेत. अशा माहिती जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
ग्रामविकास विभागाच्या निर्मल वारी उपक्रमामुळे भाविक खुश दिसून येत आहेत. पाणी व स्वच्छता विभागामार्फत आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये 10 मानाच्या पालख्या करिता 60 ठिकाणी 11987 तात्पुरते शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
10 शौचालयापाठीमागे (200 लिटरचे) एक ड्रम याप्रमाणे 11987 शौचालयासाठी 1250 ड्रम निश्चित करण्यात आलेले आहे. मैलगाळ व्यवस्थापनासाठी 57 सक्शन मशीन, 57 जेटींग मशीन तयार ठेवण्यात आले आहे. विभागामार्फत 1500 स्वच्छता व साफसफाई स्वंयसेवक नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच तात्पुरते शोचालय व्यवस्थापनासाठी पुरवठादारामार्फत एकावेळी 283 कर्मचारी, 42 पर्यवेक्षीय कर्मचारी नेमले जात आहेत. सदर वारीकरिता जिल्हास्तरावरुन 6 अधिकारी वर्ग, 31 जिल्हास्तरीय कर्मचारी व 86 विस्तार अधिकारी व ग्रामसेवक असे एकूण 123 अधिकारी व कर्मचारी नेमले जातात.
आषाढी यात्रा अंतर्गत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 11889 शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था महिलांसाठी स्वतंत्र व्यवसाय व्यवस्था करण्यात आलेली आहे.
शौचालयाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची उभारणी करण्यात आलेले त्याच ठिकाणी शौचालयाची देखील उपस्थित करण्यात आलेली आहे. सिईओ कुलदीप जंगम यांनी आज वाखरी, भंडीशेगाव , पिराची कुरोली येथील पालखी सोहळ्याचे ठिकाणी शौचालय व स्नानगृह व्यवस्थेची पाहणी केली.
तर वाखरी येथे ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी पाहणी केली.
ग्रामविकास विभागाच्या निर्मल वारी उपक्रमामुळे भाविक खुश
पालखी मार्गावर भाविकांसाठी मुबलक शोचालय सुविधा केल्यामुळे वारकरी यांचे मधून समाधान व्यक्त केले जात आहे. पुरेसा पाणी व्यवस्था, शौचाहून आलेनंतर साबणाने स्वच्छ हात धुणेची व्यवस्था करणेत आली आहे. रात्रीचे वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था करणेत आली आहे. पालखी तळाचे बाजूस व्यवस्था केले मुळे वारकरी यांची सोय झाली आहे. पालखी सोहळा किमान तीन किलो मिटर च्या आंतरात मुक्कामास असतो. त्या दृष्ट्रीने सात ठिकाणी व्यवस्था करणेत आलेली आहे. तसेच भाविकाच्या व पालखी सोहळा प्रमुखाचे मागणी नुसार सुविधा करणेत येते.
आज
गतवर्षी पेक्षा चार पट शौचालय सुविघा
…………………
गतवर्षी पेक्षा चार पट शौचालय सुविघा देणेत आलेली असल्याचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले. नाशिक, पुणे, जळगाव, या ठिकाणाहून पालखी सोहळ्या समवेत शौचालय सुविधा देणेत आली असल्याचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले.