सोलापूर : भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आणि पॉलिटेक्निकमध्ये चालू असलेले शैक्षणिक वर्षासाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या अभियांत्रिकी विभागांना प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी या विभागामध्ये प्रवेश घेण्यासाठी पुढे येत आहेत. सोलापूर नव्हेतर लातूर, बीड, सांगली, धाराशिव, सातारा आदी जिल्ह्यामधूनही विद्यार्थ्यांचा ओढ वाढलेला दिसून येतो.
भारतरत्न इंदिरा गांधी महाविद्यालय हे गेल्या अनेक वर्षापासून शंभर टक्के प्रशिक्षण व प्लेसमेंटची हमी देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत उद्योग जगातील प्रत्यक्ष अनुभवदेण्यासाठी इंडस्ट्री ओरिएंटेड प्रोजेक्ट ऑन जॉब ट्रेनिंग आणि आधारित कोर्सचे प्रभावी आयोजन केले जाते. कॉलेजमध्ये अनुभवी तज्ञ आणि विषयाशी निगडित शिक्षक वर्ग कार्यरत आहे. पर्सनल कौन्सलिंग आणि कॅरिअर गायडन्सही विद्यार्थ्यांना दिले जाते. आधुनिक लॅब कार्यशाळा तसेच कार्यक्षम व प्रयोगशील शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना व्यवहारिक अनुभव, पर्सनल कौन्सलिंग दिली जाते. याबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने म्हणाले, विद्यार्थ्यांना केवळ डिग्री नव्हे तर उद्योगक्षम आत्मनिर्भर आणि साक्षम व्यावसायिक बनवणं हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. केवळ मार्काची शर्यत न बघता कॅरिअरकडे पाहण्याची व्यापक दृष्टी आम्ही विद्यार्थ्यांना देतो.
भारतरत्न इंदिरा गांधी महाविद्यालय मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही तर त्यांना इंडस्ट्रियल उपयोगी पडतील अशा कौशल्य निस सज्ज करतो. आज मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागांना मिळणारा प्रतिसाद ही आमचा गुणवत्तेवर विद्यार्थ्यांचा विश्वास आहे.