सोलापूर : स्वयं शिक्षण प्रयोग, युनिसेफ व हिंदुस्थान युनिलीवर यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर महानगरपालिका आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचा-यास मोफत पाच हजार N95 मास्क आणि दहा हजार मोती साबण आज महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.स्वयं शिक्षण प्रयोग, युनिसेफ व हिंदुस्थान युनिलीवर यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कोविड १९ कंट्रोल सेंटर येथे आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचा-यास मोफत पाच हजार N95 मास्क आणि दहा हजार मोती साबण पालिका आयुक्त पी.शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सफाई कर्मचा-यास चार मोती साबन आणि दोन मास्क वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली. या ठिकाणी उपस्थित असलेले आरोग्य कर्मचारी यांना आयुक्त पी.शिवशंकर व मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात मास्क व साबण वाटप करण्यात आले .या प्रसंगी उपायुक्त धनराज पांडे, अशोक वाघमारे, जिल्हा समन्वयक काकासाहेब अडसुळे, देवकन्ना जगदाळे समूह शिक्षण प्रयोग, पुणे, अमर श्रीमल, मंगल धुमाळ, शुभराज जेऊरे उपस्थित होते.