सोलापूर : डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर या संस्थेतील अधिष्ठाता या पदावर कार्यरत डॉ. संजीव ठाकूर हे नियतवयोमानानुसार दि.३०.०६.२०२५ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे संस्थेतील रिक्त अधिष्ठाता पद भरणे आवश्यक आहे. आता प्रशासकीय कारणास्तव डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. ऋत्विक जयकर, प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात येत आहे. डॉ. ऋत्विक जयकर, प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांनी स्वतः च्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्य ा सांभाळून अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी वेगळे आदेश काढण्याची आवश्यकता नाही.