सोलापूर — महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज विमानतळ येथील संरक्षण भिंत ,विमानतळातील बाहेरील परिसराची पहाणी केली.यावेळी प्रांत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, सोलापूर विमानतळचे विमानपत्तन निदेशक सी. एन. वनजारा, सहायक महाप्रबंधक श्रीमती अंजनी शर्मा , टर्मिनल मैनेजर वीरेंद्र सासी, वन विभागाचे अधिकारी, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके,अतिक्रमण विभागाचे प्रमुख हेमंत डोंगरे, मंडई विभागाचे प्रमुख मालिनाथ तोडकर, विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर, विभागीय अधिकारी नंदकुमार जगधनी, सुनीता हिबारे,पशु वैधकीय अधिकारी डॉ.सतीश चौगुले हे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विमानतळाच्या बाहेरील परिसरामध्ये नई जिंदगी रोड येथील वॉल कंपाउंड लगत झालेल्या अतिक्रमणाची मा.आयुक्त यांनी पाहणी केली.

विमानतळ बाहेरील भिंतीलगत अतिक्रमण केलेल्या घरानां नोटीस देणे,भींती लगत रस्त्यावर असणारे खोके,पान टपरी,वर्षं वर्ष बंद पडलेले वाहन इत्यादी परिसरतातील अतिक्रमण काढणे, ठीक ठिकाणी साचलेला कचरा व परिसर स्वछता करणे.

त्या ठिकाणी परिसरातील नागरिकांना संरक्षण भिंती बाहेरील भागात कचरा टाकू नये या संदर्भात नागरिकांना सूचना देणे. त्या ठिकाणी मोकाट कुत्रे हे विमानतळ परिसरात जाणार नाही याची दक्षात विमानतळ प्राधिकरण यांनी घेण्या संदर्भात मा.आयुक्त यांनी सूचना दिल्या.