सोलापूर : सातवा वेतन आयोग, आश्र्वासित प्रगती योजना लागू करणे लागू करणे आदी मागण्यासाठी २४ सप्टेंबरपासून विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लेखनी व ठीया बंद आंदोलन सुरू आहे. यास सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ठिया आंदोलनास युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी युनियनच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र गोटे यांनी ही घोषणा केली. युनियनचे उपाध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस अजितकुमार संगवे, आनंद व्हटकर, राजू पांढरे आदी उपस्थित होते.