येस न्युज मराठी नेटवर्क : ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ या सुप्रसिद्ध प्रार्थना गीताचे गीतकार अभिलाष यांचे कॅन्सरने निधन झाले. काल रात्री त्यांनी अंतिम श्वास घेतला. अभिलाष हे दीर्घकाळापासून कॅन्सरला झुंज देत होते. मार्च महिन्यांत त्यांच्या पोटातील एका ट्युमरचे आॅपरेशन झाले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. काल रात्रीच गोरेगाव पूर्वच्या शिवधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.‘इतनी शक्ति हमें देना दाता’ या लोकप्रिय गीताशिवाय सांझ भई घर आजा, आज की रात न जाना, वो जो खत मुहब्बत में, तुम्हारी याद सागर में, संसार एक नदीया, तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर अशी त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली होती. सुमारे चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाणी लिहिलीत. शिवाय चित्रपट व मालिकांचेही लेखन केले.पटकथा-संवाद लेखक म्हणूनही त्यांचे अमूल्य योगदान राहिले. अदालत, धूप छाँव, दुनिया रंग रंगीली, अनुभव, संसार, चित्रहार, रंगोली अशा अनेक लोकप्रिय शोचे लेखन त्यांनी केले.
◼️असे रचले गेले अजरामर ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ …
1985 साली एऩचंद्रा यांनी ‘अंकुश’ हा सिनेमा बनवायला घेतला. त्यावेळी एऩ चंद्रा स्ट्रगल करत होते. त्यांना चंदू म्हणून ओळखले जात असे. या चित्रपटाला कुलदीप सिंह यांनी संगीत दिले तर अभिलाष यांनी गाणी लिहिली. याच चित्रपटासाठी अभिलाष यांना एक प्रार्थना गीत लिहिण्यास सांगितले गेले. गीतकार अभिलाष कामी लागले़ तब्बल दीड महिना ते रोज एऩ चंद्रासोबत बसत आणि ‘अंकुश’साठीच्या प्रार्थना गीताचा मुखडा लिहिण्याचा प्रयत्न करत. पण एऩ चंद्रा दरवेळी नकार देत. त्यादिवशी अभिलाष यांचा संयम सुटला.