सोलापूर : सोलापूरचे सुंद्रीवादक भीमण्णा जाधव यांना मध्यप्रदेशचा उस्ताद लतीफखॉं पुरस्कार जाहीर झाला आहे. उस्ताद लतीफखॉं हा पुरस्कार मिळवणारे पंडित भीमण्णा जाधव हे महाराष्ट्रातील पहिले कलावंत आहेत. देशपातळीवर दरवर्षी या पुरस्कारासाठी एका कलावंताची निवड केली जाते. 51 हजार रुपये रोख सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुंद्री हे अत्यंत दुर्मिळ वाद्य आहे. जाधव घराण्याने या सुंद्रीची निर्मिती तसेच संवर्धन करून मोठा प्रसार केला आहे. येस न्यूज मराठी च्या माध्यमातून देखील भीमण्णा जाधव यांनी अनेक वेळा सुंद्री वादनाचे कार्यक्रम केले आहेत . भीमण्णा जाधव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल येस मराठी’च्या वतीने त्यांचे अभिनंदन…