मंद्रूप : किसान सभेच्या वतीने अतिवृष्टीचे पंचनामा होऊन हेक्टरी 50 हजार रुपये मिळावे यासाठी अप्पर तहसीलदार समोर निदर्शन करण्यात आली,
दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेतकऱ्यांचे खरीप व बागायती फळबाग पीक वाया गेलेले आहे सदर पिकांचे तातडीने पंचनामे हाेवून हेक्टरी ५०००० रू. मदत मिळाली पाहिजे केंद्र सरकारने शेतकरी विरोधी जाचक विधेयक कायदा पास केलेला आहे सदर विधेयकामध्ये सुधारणा होऊन किमान हमीभाव चा उल्लेख व्हावा काेराेना काळा मधील सर्व घरगुती वीज बिल माफ व्हावे शेतमजूर बांधकाम मजूर सभासदांना प्रती महीना १०००० रू ची मदत करीता शासनास पाठपुरावा व्हावा महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे वरील मागण्या करीता आज २५ सप्टेंबर निर्देशना द्वारे आपल्या कडे सादर करीत आहोत गोकुळ साखर कारखान्याकडून थकलेले ऊसबील त्वरित अदा करावे
यावेळी अखिल भारतीय किसान सभा जिल्हा अध्यक्ष सिद्धाप्पा कलशेट्टी, शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष महामुद पटेल, किसान सभा तालुका अध्यक्ष डॉ शिवानंद झळके, मंदु़ृप शहर अध्यक्ष जावेद आवटे , तालुका सचिव श्रीमंत डोमनाळे , धुंडप्पा कोल्हे, बिळ्यानी सुंटे, पैगंबर नदाफ, पमोद झळके, यासिन मकानदार व शेतकरी बांधव उपस्थित होते