सोलापूर दि २१ : उजनी धरण ७३% टक्के भरलेले आहे व दौंड येथील उजनी धरणातील येवा देखील ३५००० ते ४०००० क्युसेक्स असल्याने उजनी धरणातून १६६०० क्युसेक चालू असणारा विसर्ग वाढवून २१६०० क्युसेक करण्यात येणार आहे, तसेच वीर धरणातूनही २००० क्युसेक विसर्ग नीरा नदीमध्ये चालू करण्यात आलेला आहे. वरील सर्व बाबींचा विचार केल्यास ~पंढरपूर येथे २५००० ते २६००० क्युसेक विसर्ग भीमा नदीमध्ये चालू होण्याची शक्यता आहे.~