12 जून रोजी झालेल्या अहमदाबाद विमान अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी फक्त विश्वास कुमार हे एकमेव जीवंत वाचले होते. उर्वरित सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विश्वास कुमार यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्या बरे होण्यामागे डॉक्टरांची मेहनत आणि त्यांच्या मानसिक ताकदीचं मोठं योगदान मानलं जात आहे.