मंद्रूप : मुसळधार पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यासह मंद्रूप भागातील शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,तरी शासन संबंधित शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई लवकर देण्यात यावे असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना यांच्याकडून अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांना देण्यात आले.
तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत झालेल्या मंद्रूप ते वडबाळ तांडा रस्त्यावर पाणी साचलेला आहे, त्यामुळे गावाशी शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे त्या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे असेही निवेदन यावेळी देण्यात आले.
आठ दिवसात रस्त्याचे काम नाही झाले तर तहसील कार्यालय समोर शेतकऱ्यांना घेऊन प्रहार स्टाईलने आंदोलन करू असे प्रहार जनशक्ती पक्ष संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष सिद्धाराम काळे यांनी इशारा दिला.
तालुक्यासह मंद्रुप भागातील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे तलाठी करत आहेत, शेतकऱ्यांनी तलाठ्यांना घेऊन पंचनामे करावे असे यावेळी अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांनी यावेळी आवाहन केले.
यावेळी मंद्रूप शहराध्यक्ष उस्मान नदाफ, रुग्णसेवक रमेश कुंभार, दिलीप शिंदे, अमजद मकानदार, शरणाप्पा कांबळे, रमेश वाघमारे, गजानन लोंभे सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.