सोलापूर (प्रतिनिधी): योग्य आहार आणि रोजच्या व्यायामाने आपण हृदयविकार रोखू शकतो, असे प्रतिपादन माधवबाग हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. शलाखा गायकवाड यांनी केले.लोकमंगल बँकेतर्फे जागतिक हृदविकार जागरूकता दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. गायकवाड बोलत होत्या. याप्रसंगी माधवबाग हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. शलाखा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी त्यांनी माणसाची जीवनशैली, आहार कसा असावा याची सविस्तर माहिती दिली. यावेळी हेडगेवार रक्तपेढीचे सुनिल हरहरे, मुख्य शाखेचे व्यवस्थापक निशांत देवडकर, अनिता जगदाळे, शुभदा हरहरे यांच्यासह बँकेचे ग्राहक, कर्मचारी उपस्थित होते.