सोलापूर – गेली साठ वर्षांपासून देशाचे नेते पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी काका साठे यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
गेली साठ वर्षांपासून काका साठे हे खा.शरद पवार यांच्या एकमुखी नेतृत्वाखाली राजकारणात सक्रिय आहेत.राष्ट्रवादी काॅंग्रेस निर्मितीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेतेमंडळींनी खा.शरद पवार यांच्या पक्षाकडे पाठ फिरवली होती.त्यावेळी काका साठे यांनी पक्षाचे नेतृत्व केले.एक पक्षाचे व एक आघाडीचे असे दोन खासदार, तीन आमदार निवडून आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितीच्या वेळी त्यांना काॅंग्रेसमध्ये राहण्यासाठी माजी मंत्री कै.दीनानाथ कमळे गुरुजी यांनी ऑफर दिली होती.मात्र पवार निष्ठेपुढे कोणतेही पद गौण असल्याचे सांगून त्यांनी पवार यांच्या सोबतच राहणे पसंद केले. पंधरा दिवसांपूर्वी साठे यांची तब्येत अचानक ढासळली होती.मात्र दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विश्रांती न घेता पक्ष कार्यासाठी ते सक्रिय झाले.डाॅक्टरांनी तशी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.मात्र शरदनिष्ठेपुढे सर्व गौण असल्याचे त्यांनी सांगितले.