सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सम्राट चौक येथील डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन संजीव पाटील, दादासाहेब साळुंखे, माधुरी ताई पाटील, केतनभाई शहा,नीलिमा शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.