सोलापूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर शहर पोलीस पेट्रोल पंप येथे कोरोना महामारीत 24 तास कर्तव्य बजावणारे कर्मचारी यांना मास्क,सॅनिटायझर व शरीरातील हूमूनिटी वाढावी म्हणुन एनर्जी ड्रिंक चे वाटप प्रभाग 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी वाटप केले. त्याप्रसंगी पेट्रोल पंपाचे इन्चार्ज वसमाळे, कर्मचारी आकाश इंगळे, राम सुरवसे, हजिराबी शेख, नाझिया शेख, कोरेगावकर, कांबळे, चव्हाण, विजय काळे व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते व केले कार्याबद्दल आभार व्यक्त केले.