बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचे वडील आणि बालाजी अमाईन्सचे अध्यक्ष ए. प्रताप रेड्डी यांचे भावजी कै.दुन्दुरापू मल्ला रेड्डी यांचे शनिवार २४ मे रोजी रात्री ९:३० वाजता निधन झाले.मृत्यू समई त्यांचे वय ९० होते . अंत्ययात्रा उद्या सोमवारी २६ मे रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांच्या मोठ्या मुलाच्या – दुर्गा रेड्डी यांचे भवना एन्क्लेव्ह, बोईनपल्ली सिकंदराबाद येथील निवासस्थानावरून निघणार आहे सिकंदराबाद येथिल तिरुमलगिरी स्मशानवाटीका येथे अंत्यविधी होणार आहे . त्यांच्या मागे पत्नी,दुन्दुरापू गालम्मा, तीन मुले दुर्गा रेड्डी ,राम रेड्डी,नरेंद्र रेड्डी ,सुना विमला रेड्डी,वंदना रेड्डी,मधुमती रेड्डी, मुलगी भाग्यम्मा व जावई नरसिंह रेड्डी नातू व पणतू असा परिवार आहे.