सोलापूर :- ॲड . माणिकराव कोकाटे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य हे दि.25 मे 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.
रविवार दि.25 मे 2025 रोजी पुणे येथून मोटारीने दुपारी 02.30 वा. पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा कडे प्रयाण व दर्शनास उपस्थिती. दुपारी 03.30 वा. पंढरपूर येथून अरण ता. माढा कडे प्रयाण. 04.00 वा. अरण येथे आगमन घाडगे फार्म पाहाणी व राखीव. 04.30 वा अरण येथून मोटारीने शेलगाव- वांगी ता. करमाळा कडे प्रयाण . सायं. 05.30 वा शेलगांव- वांगी येथे आगमन व तालुका फळरोपवाटीका, जेऊर व केळी संशोधन केंद्र शेलगाव येथे भेट व राखीव. सायं. 06.00 शेलगाव वांगी ता. करमाळा येथून कंदर ता. करमाळा कडे प्रयाण. सायं. 06.30 कंदर ता. करमाळा येथे आगमन व किरण डोके , फळांचे पुरवठादार यांचे पॅक हाऊस व कोल्ड स्टोरेज प्री कुलिंग पहाणी व राखीव .सायं. 07.30 वा. कंदर येथून भीमानगर ता. माढा कडे प्रयाण. रात्री 08.00 वा उजनी , शासकीय विश्रामगृह , भीमानगर, ता. माढा येथे आगमन व मुक्काम करतील.