सोलापूर – जिल्हा परिषदेचे माजी कनिष्ठ प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ 25 मे रोजी सोलापूरात सुरेल गीतांच्या मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन सुनीता राठोड यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सर्वांशी मनमिळावू स्वभावाचे असणारे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांचे हैदराबाद रोड अपघाती निधन झाले होते. विविध संघटनांच्या माध्यमातून ते जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असत. विवेक लिंगराज यांच्या जाण्याने जिल्हा परिषदेतील हजारो कर्मचाऱ्याऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुरेल गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आलं आहे. 25 मे रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर ,पार्क चौक येथे ‘याद आ रहा है… तेरा प्यार ‘अशा सुरेल गीतांचे आयोजन करण्यात आले आहे.
सुनिता राठोड प्रेझेंट्स या कार्यक्रमात ऑल इंडिया रेकॉर्ड केलेले मोहम्मद हुंडेकरी, मयूर पवार, सुभाष चव्हाण, बासंती लोणी, जगदीश मेटकरी आणि जूनियर गोविंदा यांची कला आणि गायन सादर होणार आहे. अशी माहिती आयोजक सुनिता राठोड यांनी माध्यमांना दिली. या पत्रकार परिषदेस मुलगा अवनिश विवेकानंद लिंगराज, भाऊ विजयकुमार लिंगराज, भाऊ विक्रमकुमार लिंगराज, भाऊ विश्वजीत लिंगराज आणि मोहम्मद हुंडेकरी हे उपस्थित होते.