भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर टर्की आणि अझरबैजानवर भारतीय पर्यटकांकडून बहिष्कार टाकण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये टर्की आणि अझरबैजानमधून येणाऱ्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जात आहे.
टर्की आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे भारतीय नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होताना दिसतोय. या असंतोषाच्या परिणामस्वरूप, भारतीय पर्यटकांनी या दोन्ही देशांमध्ये होणारे पर्यटन टाळण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या टर्की आणि अजरबैजानला जाणाऱ्या 60 टक्के पर्यटकांनी आपले नियोजित बुकिंग रद्द केल्याची माहिती ट्रॅव्हल्स एजेंट असोसिएशन ऑफ इंडियाने दिली.