नवी मुंबई, ऐरोली येथे गरुडझेप स्वयंसिध्दा सोशल वेल्फेअर फांउडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला महाउद्योजक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची लाडकी उद्योजिका आणि समाजकार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोलापूरच्या सहाय्य व्यसनमुक्ती केंद्रांच्या सचिव गौरी जोशी यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

विशेष म्हणजे गौरी जोशी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे ही होत्या. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यातून सोशल वर्कसाठी पुरस्कार देऊन निवड करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले उपस्थित होते. यावेळी समाजसेवक एस. सिसोदिया, जे.एन.सी. न्यूज चॅनलचे आब शिंदे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या डायरेक्टर आर्या जोशी यांनी ही संस्थेच्या कामकाजाविषयी माहीती दिली. पुरस्कार चैताली चटर्जी यांच्या हस्ते देण्यात आले.

सूत्रसंचलन गरुडझेप स्वयंसिध्दा फाऊडेशनच्या डायरेक्टर अॅड. कल्पना कुलकर्णी यांनी केले.