सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व डॅनिश केक सोलापूर पुरस्कृत 19 वर्षाखालील मुलांचे.सोलापूर येथील भंडारी मैदान येथे 19 वर्षाखालील मुलांचे कै. किरण पवार चषक स्पर्धेचे उदघाटन सोलापूरचे उद्योगपती शोभा कुमार ठाकूर यांचे अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष बसवराज सलगर व आयपीएल स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी केलेले सोलापूरचे अनिस सहस्त्रबुद्धे यांचे हस्ते करण्यात आले.
ही स्पर्धा सोलापूर येथील सुप्रसिद्ध डॅनिश केक चे मालक प्रदीप सलगर यांनी पुरस्कृत केली आहे.
या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसो, उपाध्यक्ष प्रकाश भुतडा , टूर्नामेंट कमिटीचे चेअरमन संजय वडजे, 16 व 19 वर्षाखालील निवड समिती चे चेअरमन श्री. सुनील मालप, 14 वर्षाखालील निवड समितीचे चेअरमन राजेंद्र गोटे, टूर्नामेंट कमिटी सदस्य ऋत ज चव्हाण हे सर्व सदस्य उपस्थित होते.
सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन शिवानंद अकलूजकर यांनी केले. आज दिनांक 12 मे 2025 रोजी सदर स्पर्धेतील पहिला सामना सोलापूरचा युनायटेड क्रिकेट क्लब विरुद्ध बार्शीच्या आनंद शेलार यांचा Hpcc क्रिकेट क्लब यांचे बरोबर होणार आहे.
सदरच्या स्पर्धा सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन रणजीत दादा मोहिते पाटील, व्हॉइस चेअरमन श्रीकांत मोरे, माजी अध्यक्ष दत्ता अण्णा सुरवसे व सचिव धैर्यशील भैया मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.