महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या [MPSC] अभियांत्रिकी स्थापत्य विभाग- 2023 चा अंतिम निकाल शुक्रवारी लागला. यामध्ये परिस सुरेश गायकवाड यांनी राज्यात दुसरा क्रमांक (Rank -2) पटकावला आहे .तो आता उप कार्यकारी अभियंता (AEE) पदावर रुजू होईल. राज्यातील पाणीपुरवठा अगर जलसंपदा विभागात संधी मिळुन शकते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड व सोलापूर बार असोसिएशनसचे माजी अध्यक्ष ॲड .सुरेश गायकवाड यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र आहेत परिस गायकवाड हे ऑगस्ट २०१९ पासून महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. ते वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे विभागात शाखा अभियंता या पदावर सेवा बजावत आहेत. आपली नोकरी सांभाळत त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परिस गायकवाड यांचे शालेय शिक्षण सोलापूर येथील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये झाले, पुढे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरीग चा डिप्लोमा शासकीय तंत्रनिकेतून सोलापूर येथे पूर्ण केला. तर उच्च शिक्षण मुंबई येथील सरदार वल्लभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय येथे बी टेक ची पदवी मिळवली. त्यानंतर पुढे महाराष्ट्र राज्याच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया परीक्षेत राज्यात दहावी रँक पटकावून त्यांनी शासकीय सेवेत प्रारंभ केला होता. विशेष म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलेले सुमारे दोन डझन विद्यार्थी शासकीय सेवेत रूजू झाले आहेत.ते उत्तम मार्गदर्शक म्हणून देखील परिचीत आहेत.त्याचे मूळचे गाव बार्शी तालुक्यातील शेळगाव हे आहे . त्याचे आजोबा भालचंद्र तुकाराम गायकवाड हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत.