सोलापूर – येथील सूत व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते केतन मनसुखलाल वोरा यांची मध्य रेल्वे विभागीय वापरकर्ता समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
ही निवड २ वर्षाकरिता असून खा. प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीनुसार ,मध्य रेल्वे मुंबई कार्यालय ने नुकतेच त्यांना हे पत्र दिले आहे. त्यांची ही निवड तिसऱ्यांदा झाली असून ह्यपापूर्वी २०१७-१९ व २०२१-२३ कालावधीकरिता त्यांनी ह्या समितीवर कार्य केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.