मोहोळ : श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये दत्तात्रय चांगदेव गोडसे यांचे स्मरणार्थ अविनाश दत्तात्रय गोडसे, प्रशासन अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद सोलापूर व सतिश दत्तात्रय गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, (भाईंदर) मुंबई यांचेतर्फे यात्रेकरुना पिण्याच्या पाण्याची सोय करणेत आली. यात्रेकरूना बाळासाहेब गायकवाड माजी उपसभापती पंचायत समिती मोहोळ, सुधीर गायकवाड प्राचार्य कन्या प्रशाला मोहोळ यांचे शुभहस्ते करण्यांत आले.
सदर प्रसंगी सुनिल गायकवाड, कारभारी गायकवाड, अविनाश गोडसे, सतिश गोडसे, आसावरी गोडसे, आदेश गोडसे, श्लोक गोडसे, जान्हवी गोडसे, विभावरी गोडसे, माहेश्वरी गोडसे, वैष्णवी चव्हाण, शिवदत्त चव्हाण, ऋतुराज गायकवाड, यासीन ईनामदार, अय्युब इनामदार, सुरेश राऊत, सुहास निचळ, राजाभाऊ गुंड, सयाजीराव देशमुख, शशिकांत धोत्रे, दिलीप बरकडे, दिगंबर व्होनमाने, बाहुबली खळडेकर आदि उपस्थित होते. यात्रेकरूनी गोडसे बंधूनी पाणी वाटप केलेबद्दल शुभेच्छा दिल्या.