सोलापुरातील डॉ. कमलकुमार नागनाथ जिड्डीमनी यांनी अमेरिका स्थित "इंटरनॅशनल बोर्ड ऑफ वेटरनरी ऑफथालमोलॉजी" चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला असून "व्हेटर्नरी ऑफथालमोलोजिस्ट " म्हणून ते पुण्यातील ' द आय वेट ' येथे सेवेत रुजू झाले आहेत. सोलापुरातील विडी घरकुल परिसरातील सुप्रसिद्ध प्रॅक्टिशनर व "निमा " संघटनेचे सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ मारुतीराव जिड्डीमनी यांचे ते सुपुत्र आहेत.
डॉ. कमलकुमार हे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलचे विद्यार्थी असून यांनी उदगीर येथील “कॉलेज ऑफ व्हेटर्नरी अँड ॲनिमल सायन्सेस” मधून बीव्हीएससी अँन्ड ए एच ही पदवी प्राप्त केली. त्यांनी आपले ” एमव्हीएससी.(सर्जरी)” हे पदव्युत्तर शिक्षण “क्रांतिसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, शिरवळ” येथून पूर्ण केले .
दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या एमपीएससी परीक्षेतही त्यांनी यश संपादन केले होते व “पशुधन वैद्यकीय अधिकारी” या क्लासवन पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र सुपर स्पेशालिटी डिग्री घेऊन प्रॅक्टिस करण्याच्या इराद्याने त्यांनी ही नोकरी सोडली व थेट अमेरिका स्थित “इंटरनॅशनल बोर्ड ऑफ वेटरनरी ऑफथालमोलॉजी” या संस्थेत प्रवेश मिळवला. ही डिग्री यशस्वीरित्या पूर्ण करून ” व्हेटर्नरी ऑफथालमिक सर्जन” म्हणून सेवेत रुजू झाले आहेत.
या माध्यमातून वीविध पशूंच्या डोळ्यांचे आजार व किचकट शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी प्रदान करण्याचे प्रयोजन असल्याचे डॉ.कमलकुमार जिड्डीमनी यांनी सांगितले. त्यांच्या या प्रवासामध्ये वडील डॉ. नागनाथ जिड्डीमनी, मातोश्री एडवोकेट वैशाली जिड्डीमनी यांचे मार्गदर्शन व पत्नी डॉ. तेजश्री आणि भाऊ डॉ. कपिलकुमार तसेच ‘द आय वेट च्या सर्वे सर्वा डॉ.कस्तुरी भडसावले याचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले आहे. सोलापूरच्या या सुपुत्राच्या गगन भरारी चे समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे

