सोलापूर — सोलापूर शहर व हद्दवाढ भागात सोलापूर महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. चालू हंगामात राज्याचे पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने उजनी धरणात व हिप्परगा तलावात पाण्याची पातळी कमी असल्याने उपलब्ध पाणी साठा काटकसरीने करू येणाऱ्या उन्हाळ्यातील पाणीपुरवठा सुरळीत राहणे गरजेचे आहे
शहर व हदवाड भागातील नागरिकांकडून मिळकत दाराकडून ज्या ठिकाणी ज्या परिसरात पाणीपुरवठा सुरू असतो त्या दिवशी तेथील रहिवासी कडून धुणे, भांडे,दुचाकी, चार चाकी वाहने स्वच्छ करणे रस्त्यावर पाणी मारणे इत्यादीसाठी अनावश्याक पाणी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे रस्त्यावर पाणी मारल्याने रस्ता ना दुरुस्त होऊन रस्त्यावर खड्डे पडत आहेत व पाणी उताराच्या दिशेने वाहून डबके तयार होऊन पाणी साचून अनारोग्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.तरी सोलापूर महापालिका अंतर्गत प्रामुख्याने सर्व विभागीय अधिकारी व त्यांच्या अधिनस्त असलेले पाणीपुरवठा चे काम पाहणारे कनिष्ठ अभियंता तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सर्व आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या मार्फत आहे पिण्याचे पाणी अपव्यय व नासाडी करणाऱ्या नागरिकांवर रक्कम रुपये 200/- इतकी बिनचूक दंडात्मक कारवाई करण्यात येणारा आहे. तरी शहरातील नागरिकांना पाण्याचा योग्य वापर करावे.
तसेच कोणास असे घडताना आढळून आलेस त्यांनी झोन कार्यालयास संपर्क करावा